कारण आपण आपल नशीब आपल्या हातानेच घडवायला हव! मीही याच मताची आहे पण मग पत्रिका काय आहे?
मला विचाराल तर आपला कसा मित्रपरिवार असतो तसाच पृथ्विचाही आहे.हे सगळे ग्रह याच मोठ्या मित्रपरिवारातले आहेत.पत्रिकेत एकुण बारा भाग असतात.आपल्या आयुष्याचे महत्वाच्या पडावाचे हे दर्शक आहेत.आपल्या बाहेरील जगाला दिसणारा चेहरा, रूप, स्वभाव यापासून ते आपल मन, त्यातील सुप्त इच्छा, आपल्या भोवातीची जिवाभावाची माणसे, मित्रपरिवार,समोर येणारी संकटे, त्यातून लढण्याची मानसिकता, मनाचा ठाव घेणारे छान विसाव्याचे क्षण , श्रद्धा स्थान आणि बरच काही......
आपले काही मित्र खुप गंभीर असतात ,काही मनापासून आपल्या जवळ असतात, काही शीघ्र-कोपी, काही शांत, काही निखळ हसवणारे तर कोणी समजुतदार ,म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रकृति .ग्रहांनाही असे स्वभाव असतात बरका,किंबहुना ग्रह या स्वभावांच्या छठा आहेत.मी आधी सांगितल्याप्रमाणे आयुष्यातील कुठल्या महत्वाच्या पडावावर कोणता मित्र/ग्रह भेटतो त्यावर आपल भविष्य ज्योतिषी सांगतो.अर्थात याला अजुन बराच सखोल आभ्यास आणि तर्क याची साथ असावी लगते.
चला एक उदहारण बघुयात .आपल्या पत्रिकेतील पहिल घर तुमचा मुळ स्वभाव कसा आहे आणि तुम्ही जगाला कसे वाटता याबद्दल माहिती सांगतो.समजा तुमच्या पहिल्या घरात मंगळ हा ग्रह आहे.मंगळ याचा स्वभाव तापट, पराक्रमी, शीघ्र निर्णय घेणारा असा आहे. सहाजिकच अश्या वक्ती लोकांना कधी कधी वर्चस्व गाजवणारया वाटु शकतात, त्यांचा शारीर बान्धाही सुरेख असतो, एखाद्या पराक्रमी माणसाला शोभेल असाच.
पण हा खुपच प्राथमिक अंदाज झाला.मुळत: ग्रह कोणत्या राशीत आहे हेही तेवढेच महत्वाचे असते.वाघाला जंगलात सोडले आणि तोच वाघ पिंजर्यात ठेवला तर वाघ तोच असुनही परिस्थिती बदलते.तसेच नुसताच पराक्रमी मंगळ ग्रह असुन नाही चालणार तर त्याच्या गुणान्ना वाव देणारी परिस्थिती/राशीत तो असायला हवा।
चित्रकार जसा आधी नुसत्या कोरया कागदावर रेषा मारतो,मग त्याला आकर देतो, विविध रंग भरतो आणि आधी नुसता कोरा कागद वाटत असलेल्या कगादावरही जिवंत देखावा निर्माण करतो तसच पत्रिकेच आहे.आपल्याच आयुष्याच जिवंत चित्र यात कोरलेल असत.कोणाला ते कळत कोणाला नाही.खर, खोट, सत्य, भास याच्या पलीकडे जाऊन स्वत:ला समजण्याची संधी आपल्याला आयुष्यात मिळावी यासाठीही ज्योतिष शास्त्राची निर्मिती झाली असावी.असे माझे मत आहे।
अर्थात आपल्या ध्येयाकडे अधिक विश्वास ठेवत आणि ज्योतिष हा एक आधार आहे सर्वस्व नाही हे लोकांनी लक्षात घेतल तर मग आपल्या नशिबाचे तारे चमकतच राहतील :)