संध्याकाळी मिनी-सिआम पहायला गेलो.जगभरातील प्रसिद्ध वास्तुंची लहान प्रतिकृती इथे पहायला मिळते. त्यानंतर मस्त थाई मसाज म्हणजे सुखाची व्याख्या!
पट्टाया शहर पहाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे रंगांची..एवढे छान रंग अगदी taxi पासून ते कपडे,छत्री,दू-चाकी वहाने सगळ काही रंगांमध्ये बुडून गेले होते.तेथील लोकांना अजुन इंग्रजी भाषेचा बोलण्यातील सराईतपणा नाही पण ज्या आपुलकीने ते आपल्याशी थाई-इंग्रजी भाषेमध्ये बोलतात ते फारच श्रवणीय आहे :)
हो पण हा बोलण्यातील गोडवा तुम्ही खरेदी करताना विसरून जा...उगीचच 'चल बघुयात ना,बघायचे थोडेच पैसे पड़तात' अस म्हणुन खरेदी करण फारच महागात पडत.काही प्रसंगी उगीचच एखाद्या वस्तुची पाडून किम्मत मागीतली आणि ती घेतली नाही तर दुकानदार चिमटेही काढतात.इथे बऱ्याच प्रमाणात स्रिया दुकान चालवतात.
रात्री मात्र या शहराचा रंग वेगला असतो..हत्ती मदमस्त चाल कशी चालेल तसच सार शहर वेगळ्याच धुंदीत मदमस्त असत!
nong-nooch मधील हत्तींचा शो असो की ,मातीपासून बनवलेली बोट,कप आणि बरच काही आम्हाला त्याच्या पलीकडे असलेले नाविन्य जास्त भावले होते. 'नविन क्षण नविन अनुभव' या गतीने आमचे आयुष्य नव्याने आकाराला येत होते...सहप्रवासी मैत्रीच्या परिभाषेमध्ये सहज सामावून चालले होते.एकटेपण कायमच दूर पळुन गेले होते.रात्री एकमेकींच्या रूमवर गप्पांचे थवे उतरत होते.वयाची सीमा दूर सरून सगळ्या काकू, आजी आणि आम्ही तरुणी लहान मुलाप्रमाणे बागडत होतो. फोटो मध्ये हे सगळे क्षण टिपण्याचा प्रयत्न करत होतो।

हे सगळ नविन घडत असतानाच आदेश दादाचा आपलेपणा, त्याचे आनुभव आमचा प्रवास अजुनच स्मरणीय बनवत होते.आदेश बांदेकर या व्यक्तिमत्वाबद्दल इतके वाचले होते ,दूरदर्शन वर चमकताना पाहिले होते की वाटल होत मी कधी काही बोलूच नाही शकणार त्यांच्याशी.पण एकदा धाडस करून अहो-जाओ करण्या एवजी मी 'दादा' अशी एकेरी हाक मारली.आदेश दादाने तेवढ्याच मायेने त्याला प्रतिसाद दिला.तो पहिला क्षण जेव्हा 'आदेश बांदेकर' आपलासा आदेश दादा मनात घर करून गेला.प्रवासात भेटत असलेल्या प्रत्येकिशी तो अगदी घरातील सदस्य कसा बोलावा असच बोलत होता.मला खात्री आहे त्याचा साधेपणा प्रत्येकीला माहेरच्या मायेची जोड़ देत होता।
दादा आणि त्याच्या गप्पा सुरु झाल्या की आमचा घास हातातच रहायचा..अशीच दादाने त्याच्या सिम्बाचा (कुत्र्याचे नाव आहे जास्त विचार नका करू )साखरपुडा कसा झाला याची गोष्ट सांगितली.सिम्बा,त्याची होणारी बायको-तिचे घरातील लोक याविषयी बोलताना मी फक्त दादाच्या डोळ्यातील भाव पहात होते.अस वाटत होता की हे सगळे त्याच्या समोर आहेत आणि तो ही गोष्ट सांगतोय!एवढा हळवा 'आदेश(शब्दश:)' मी पहिल्यांदाच पहात होते.थाईलैंड मधील निसर्गाने जेवढे मला शिकवले तेवढेच एक साध्या मनाच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने-आदेश बांदेकर ने शिकवले।
पट्टाया मधील शेवटची संध्याकाळ फारच धम्माल होती.सकाळी खरेदी करताना मी आणि 2 दंगेखोर मुलींनी लाकड़ी शिट्टी विकत घेतली होती.इकडे पैठणीचा खेळ रंगत होता आणि त्याला साथ म्हणुन आमच्या शिट्टी मधून न भुतो-न भविष्यती असे स्वर निघत होते.वय वर्ष ८० च्या तरुण मनाच्या आजी आणि काकु यामध्ये चुरशीचा खेळ झाला आणि काकुंनी पैठणी जिंकली.त्यानंतर नृत्य स्पर्धा रंगमंचावर कमी आणि आम्हा दंगेखोर प्रेक्षक वर्गातच जास्त रंगली होती.जी ती सखी फक्त मनातील ताल एकत होती बाकी स्पर्धेसाठी वाजविलेल्या गाण्याचा ताल काय होता हे मी आजही नाही सांगू शकणार :) एक जरी सखी खाली दमुन बसली की आमचा (अति)उत्साही ग्रुप त्यांना पुन्हा ताल धरायला लावायचा.मनातील तारे चमकेपर्यंत आम्ही नाचलो.
दुसरया दिवशीची पहाट आली ती लखलखते रत्नं घेउन। कारण आज आम्ही gems gallery मध्ये चाललो होतो.रत्नांची उत्पत्ति, त्यांचा जगातील प्रवास हे एक ट्राम मध्ये बसून आम्ही पाहिला.तसा हा देश भारतानंतर जन्माला आला पण याने आपल्या क्षमता खुप छान समजावून घेतल्या आहेत.लहान प्रमाणात का असेना पण आपल वेगळेपण या देशाने जपल आहे.रस्ते बघा अथवा रहदारीतही शिस्तबद्धपणा !
असो तर दिवसाची सकाळ रत्नांनी चमकली आणि रात्र bangkok मधील chao phraya river क्रूस वरील क्षणांनी.संथ नदीचा प्रवाह,काठाशी दिव्यान्नी लख-लख करणारी मंदिरे, rama-III bridge ,बाजूने जाणारी रंगीत बोट आणि आमच्या बोट च्या डेक वरुन दिसणारे bangkok शहर.हे बाहेरील दृश्य प्रेक्षणीय असेल तरीही आतील दृश्य रमणीय बनाले होते.एक थाई गायिका हिंदीमध्ये गाणी गात होती,आदेश दादा आणि बाकी काही हौशी गाणारी मंडळी तिला साथ देत होते,छान पदार्थांची रेलचेल होती आणि परत एकदा सगळ्याच्या पावलांनी ताल धरला होता.१-२ तस दंगा केल्यानंतर जेव्हा 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे....' हे गाण सुरु झाला तेव्हा अचानक परतीचे दिवस जवळ येत आहेत याची चाहुल लागुन गेली......
या नंतर महिला वर्गाला पर्वणीच होती कारण खरेदीचे दिवस सुरु झाले होते.MBK mall, Platinum mall आणि Indra square इथे महिला वर्ग तुटून पडला होता.काही काकुन्ना जे इंग्रजी मध्ये बोलता येत होत ते समोरील थाई सुंदरीला कळत नसावे.पण खरेदी करताना मागे हटेल ती स्त्री काय?मग इकडे आमच्या काकू हिंदी मध्ये सांगायच्या"अरे हमारे तुलशी बाग में तो इससे सस्ता मिलाता हे, १०० baht में दो नहीतो छोड़ो" तर तिकडे थाई सुंदरी तोकड्या इंग्रजीमध्ये "no no madam,i will die" म्हणजे याच्या खाली भाव करू नका.त्या मुली calculator वर एक किम्मत लिहायच्या मग आपण आपल्याला हवी ती किम्मत लिहायची अशी भाव करण्याची तिकडे पद्धत आहे.
आमच्या काही हुशार सखी खरेदी करतानाच संध्याकाळी आयोजित kelelya फैशन शो ची तयारी करून आल्या होत्या.ramp वर चालताना मांजरीची चाल नाही दिसली पण मराठमोळी चाल, लाजलेली चाल, झप-झप चाल, सावध चाल आणि असे बरेच प्रकार आम्हाला पहायला मिळाले.पण सगळ्याच्या चेहर्यावरचा भाव एकच होता "कोणाला शोधताय तुम्ही मीच ती सुंदरी-माझाच पाहिला नंबर येणार"
हसत खेळत शेवटी परतीचा दिवस उगवला..आज bangkok दर्शन होते.chinese lane,India lane,tuk-tuk, उंच इमारती, मोठ्या भगवान बुद्धांच्या विविध मुर्तिन्नी सजलेली दुकाने , ३ पादरी रस्ते,इमारती समोर नटलेली छोटी मंदिरे आणि बरच काही मनाच्या पानांवर नोंद केल जात होत.आमची लोकल guide-नोइना थाई भाषेच्या लयात इंग्रजीचे शब्द बुडवून शहराची माहिती सांगत होती.