हिरवे लुसलुशीत गवत, त्यातुन डोकावुन पाहणारी सोनेरी पिवळी-गुलाबी-लाल रंगांची नाजुक फुले, मुक्तपणे त्या फुलांवर क्षणभर गोडी चाखुन उडुन जाणारी फुलपाखरे .... उंच डोंगर त्यावर पांढरा शुभ्र बर्फ, पायथ्याशी वाहणारी नितळ पाण्याची आणि दोन्ही काठांशी निसर्ग खुलवत जाणारी नदी...आजीच्या कोमल हातावरील गोंदलेले नाव, आजोबांच्या हसताना खुललेल्या भारदस्त मिश्या, इवल्याश्या हातांनी धरलेला आईचा पदर... पोर्णिमेच्या रात्री चंद्राबरोबर मंद हसणारी नक्षत्रांची साथ....बस एक क्लिक आणि सारे क्षण आपण कायमचे आपल्यापाशी साठवुन ठेऊ शकतो...
दिवाळी-दसरा आला की मग घराची स्वच्छता करताना धुळीमध्ये एखादा जुना अल्बम मिळतो ...हातात स्वच्छतेसाठी घेतलेला रुमाल तसाच राहतो आणि एक एक पाने उलटत आपण त्या फोटोमधुन जुने दिवस परत जगतो... छोटु चा पहिला रंगमंचावरील सादर केलेला अभिनय, ताईच लग्न, दादाचा रात्री जागुन साजरा केलेला वाढदिवस, शाळेत पहिल्या दिवशी जाताना घातलेला गणवेश , सहल, मैत्रिणीचे थवे, सेंड ऑफ पार्टी ची धमाल...बापरे....सगळ कस सही वाटता ना!
आता सहजा सहजी मिळणारे हे छायाचित्र कारीतेची साधने पुर्वी फार मजेशीर स्वरूपात दिसायची..मुळत: फोटोग्राफी याचा शब्दश: अर्थ प्रकाशाचे किरण रेखाटने असा आहे.आधी छायाचित्रणकरण्यासाठी एक खोली वापरली जायची। ज्यामध्ये जास्तीत जास्त एक किंवा दोन व्यक्ति जाऊ शकत असत.
आधीची छायाचित्रेही बराच काळ टिकून रहात नसत..त्यांना परत गिरवावे लागत असे..आता यामध्ये बरीच प्रगती झालेली आपण पाहतो.. खोलीच्या आकाराचा कैमरा आपण खिश्यातुन आज कुठेही सोइस्कर घेउन जाऊ शकतो।
कैमरा चा चित्रमय प्रवास आणि त्याची माहिती तुम्ही http://en.wikipedia.org/wiki/Camera_obscura यावर जाणुन घेऊ शकता..जगातील सर्वात पहिला काढलेला फोटो http://photography।nationalgeographic.com/wallpaper/photography/photos/milestones-photography/niepce-first-photo/ इथे पहायला मिळेल
याच काळ मधील काही जुनी छायाचित्रे यांची माहिती http://www।neatorama.com/2006/08/29/the-wonderful-world-of-early-photography/ इथे आहे
मला खात्री आहे आता पुढील फोटो काढताना फक्त फोटो नाही पण त्यामागील इतिहासाचीही प्रतिमा तुमच्या मनात क्लिक होइल :)