Friday, October 2, 2009

अनमोल नाती भाग-2

पहिली नोकरी, नविन जागा, मोजके ओळखीचे चेहरे आणि शुन्य काम! फ़ोन वर बोलताना कोणी पाहिलं तर? पर्सनल मेल वाचताना नेमका बॉस तिथे आला तर? सगळे काम करतात आणि आपण असे रिकाम टेकडे आहोत हा विचार सुरवातीच्या काही महिन्यांसाठी फारच काळजीचाच विषय होता माझ्यासाठी... (आता काम नसेल तरी आपण फार व्यस्त आहोत हे दाखविण्यात कोणी माझा हात पकडू शकत नाही ही गोष्ट वेगळी ;-) )
यासाठी मी दिवसातून फक्त canteen टाइम ची वाट बघायचे कारण याच वेळेत मी शांत पणे संदीप खरे लिखित कविता वाचू शकत होते...तेवढाच काय तो मनाला तजेला मिळायचा!

एका अश्याच संध्याकाळी मी canteen मध्ये कविता वाचण्यात मग्न होते...

"संदीप खरेची ' करार ' ही कविता वाचली आहेस का तु?"

मध्यम उंची, चष्म्यातुन बोलणारे डोळे, कुरळे केस आणि हा प्रश्न किती महत्वाचा आहे असा संगणारा चहरयावारिल भाव !

मला पहिल्यांदा समजलच नाही कोण हा? मी या कंपनी मध्ये नोकरी करणार म्हणुन , मी इथे join होण्या आधीच खुप जणांनी माझा अमुक अमुक तिथेच असतो, अस सांगुन बरयाच जणांची नावे सांगितली होती... तो हाच तर नसेल असे म्हणुन मी बरेच दाखले त्याच्या चेहरयाशी जुळवुन पाहिले पण छे प्रश्न तोच.... कोण हा? अश्या वेळी माझा चेहराच जास्त बोलतो बहुतेक

" 'अमुक अमुक ' नाव आहे माझ, मी संदीप खरे चा खुप मोठा fan आहे, मला त्याच्या जवळपास सर्व कविता पाठ आहेत.... तु जे आत्ता पुस्तक वाचातियास ना ते मी खुप वेळा वाचले आहे....'करार' नावाची त्यातील माझी आवडती कविता आहे...म्हणुन विचारल वाचालिस का तु ती कविता?"

माझ्या प्रति उत्तराची वाट न बघताच तो अजुन बोलतच होता..

" GET वाटत... म्हणुनच अशी शांत आहेस तु... मी अमुक अमुक डिपार्टमेन्ट मध्ये आहे ...हा माझा extn number ...काही मदत लागली तर सांग मला... चल bye "

मी या एकेरी सम्भाषणात फक्त एक स्मित हास्य एवढच काय ते योगदान देऊ शकले!
या प्रसंगाला मी 'माझा बहुतेक GET म्हणुन बकरा केला असेल कोणी तरी ' अस समजुन विसरुनही गेले

पण त्याने मला चांगलच लक्षात ठेवल होत..कुठेही भेटला की तो संदीप खरेच्या नविन कवितान्बद्दल मनामोकळे पणे बोलायचा... नविन अर्थपूर्ण कविता मिळाली की फॉरवर्ड करायाचा... या देवाण-घेवाणीच्या प्रवासात आम्ही खुप छान मैत्री जपली...

आज आमच्या मैत्रीला जवळपास वर्षे पूर्ण झाली आहेत. या संदीप खरे fan ने सिंगापुर मध्ये आपल्या पत्नीसह सुखाने संसार थाटला आहे... पण अजुनही त्याचे कविते वरचे आणि संदीप खरेच्या शब्दान वरचे प्रेम कमी झालेले नाही... त्याचं ईमेल आलं की ओळखाव संदीप खरेची नविन कविता आली आहे .... शब्दांची जेवढी त्याला जाण आहे तेवढीच मैत्रीची सुद्धा... म्हणुन मला आमच्या मैत्रीवर या अनमोल नात्याबद्दल सार्थ अभिमान आहे...

नकळत आमच्या मैत्रीची कविता रचणारया संदीप खरे चा विजय असो :)