किती नाती आपण सहजच जोडतो ,अगदी आपल्याही नकळत..
अशीच माझ्या आयुष्यातील काही नाती..
मी अस एकले आहे की आपल्या जन्मभराच्या साथीदाराशी आपली स्वर्गातच रेशीम गाठ बांधलेली असते
पण मला वाटतं आयुष्यामध्ये जुळणारं प्रत्येक नातं वरुनच ठरलेल असत!
आपला आयुष्याचा प्रवास हा आधीच ठरलेला असतो..
माझ्या बाबांची सारखी बदली होत असे त्यामुळे, मी तस १२ गावचे पाणी प्यायले आहे :)
दर १-२ वर्षांनी नविन लोक, नविन शाळा याची मला सवय झाली होती.
या सर्व प्रवासा दरम्यान खुप छान नाती मिळाली..अगदी अस्सल मातिमधाली..थेट मनाला भिडणारी!
पण त्याहून छान आणि मजेशीर नाती मला इथे पुण्यामध्ये गवसली.
मी इथे सुरवातीला एकटीच आले.. इंजीनियरिंग (B.E.) करण्यासाठी ..
पण जसे दिवस सरत होते तशी माझ्याशी अनेक नाती जुळत होती
मी paying guest असुनही आपल्याच मुलीसारखे वागवणारे,
गणपति आले की मोदक खायला हक्काने बोलवणारे,
मस्त पावसामध्ये चिम्ब भिजलो की गरमा गरम भजी देणारे ,
असे माझे घर मालक आणि लाडके काका काकू होते.
त्यांच्या घरी मी भाड़े देऊन रहात असले तरी बदल्यात पैश्यामध्ये न मोजता येणारे भरभरून प्रेम मला मिळाले
खानावळीमध्ये सर्वांपासून लपवून मला रोज काही ना काही खाऊ देणारया काकू,
बासरीचा सराव करता करता मला सुर भेट देणारे काका,
एकटेपणा आतून रडू लागला की नकळत हसवणारा मित्र परिवार!
पावसाचे थेम्ब झेलत माझ्या सोबत झुलणारा झोका!
मनाच्या कुपित साठवून ठेवावेत असे अनेक क्षण या लोकांनी मला दिले
आज मी इथे एकटी नाही. माझ कुटुंब माझ्या सोबत आहे..
पण मागे वळुन आयुष्याकडे पाहिल की वाटतं देवाला मनापासून धन्यवाद म्हणाव
किती समृद्ध केले आहे त्याने माझं भाव-विश्व या अनमोल नात्यांन्नी !