१४-मे-२०१७
।। श्री।।
ति.सौ.आईस,
शि.सा.नमस्कार
आज माझा पहिला mother's day.असे days वगैरे मी मानत नाही पण आज whatsapp वरील सगळे मेसेज मी जातीने वाचले. काही सुंदर ओळी मनाला विचार करायला लावणाऱ्या होत्या.काहीतर मला कित्तेक वर्ष मागे घेऊन गेले. तुझी खूप आठवण आली आणि तुला काही सांगावंसं वाटले म्हणून हे पत्र
लहानपणी आई हेच मुलांचे विश्व।
"आईला एवढ्या सगळ्या रेसिपी कश्या लक्ष्यात रहातात ते आई कधी दमत नाही की कधी आमच्यासारखी हट्ट करते!" मला अस अप्रूप लहानपणी नेहमीच वाटायचे. आम्ही कितीही दमलो तरी कितीही दूरचा प्रवास करून तू आलेली असलीस तरी आधी आम्हाला काय हवाय हे बघायचीस. पण कधी दंगा मस्ती केला की जो काही धपाटा मिळायचा की बस्स. तू शिकविलेले अभ्यासाचे धडे आजही लक्षात आहेत माझ्या 😊. अभ्यासू होण्याची आवड मला तू लावलेल्या चांगल्या सवयीनमुळेच.
मला अजूनही आठवतंय की मी शाळेतून आले की आधी तुला सगळी मजा सांगायचे. माझीच काय तू माझ्या सगळ्या मैत्रिणींची सुद्धा आवडती होतीस-आहेस!आमच्या बरोबर तू आमच्या वयाची होऊन जायचीस.
एक ड्रेस मागितला की 2 मिळायचे मग त्या साठी तू दिवाळीला " आत्ताच तर घेतली ,नवीनच आहे" असं सांगत जुनी साडी नेसायचीस. तू स्वयंपाक करताना दिलेल्या छोट्या छोट्या टीप तेव्हा मी मनावर नाही घेतल्या पण त्या आज मला खूप कामी येतात. आजही भाजी छान झाली की नाही याचे प्रमाण म्हणजे चव आईच्या हातच्या भाजीसारखी आहे वा नाही,हेच आहे
आम्ही भावंडांनी बनवलेला new year special menu तू आणि बाबा कौतुकाने enjoy कारायचात,.
मग जस वय वाढत गेले तसे नवीन गोष्टी जास्त आकर्षित करायला लागल्या. पोळी भाजी पेक्षा पिझ्झा आवडायला लागला.आपले प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र विचार असायलाच हवे ही जिद्द. बाहेरच्या जगातील आव्हाने वाढली स्पर्धा वाढली आणि नकळत माझे मी विचारांचे वेगळे चष्मे डोळ्यावर चढवले. त्यात खूप उत्साह होता सगळं स्वबळावर कमविण्यासाठी. माझ्यातील मी अस्तिव सिद्ध करत बाहेरील जगात हुशार असण्याची पावती देत होता. मी खूप खुश होते. आता तुला सांगता येतील अश्या गोष्टी कमी होत्या अस मीच ठरविले."आई ला काय कळणार न इंजिनेरिंग मधील challenges! त्यापेक्षा बाबांशी बोलते, office मधील कटकटी नको तिला सांगायला तिला उगीचच टेन्शन येईल आणि मग ती शेजारच्या ताई कडून सल्ला घे, वहिनीशी बोलून बघ अस सांगेल. आता मी माझे प्रश्न सोडवू शकते!" असे किती तरी विषय तुला मी माझ्या या विचारांच्या filter लावून सांगायला लागले. जुन्या परंपरा, शिस्त, आरोग्याची काळजी या ना अनेक कारणांवरून मी किती भांडायचे आठवतंय ना तुला. किती सल्ले द्यायचे मी तुला ,तसे ते मी आजही देते 😁. तू सारख म्हणायचीस अस वाग, अमुक कर ,तमुक कर पण मी म्हणायच,"अग आई मी मोठी झालीये आता एवढी काळजी नको करुस"आणि तुझं उत्तर ठरलेलं असायचे" आई झालीस न की मग कळेल तुला!" किती फिल्मी बोलतेस म्हणून मी ते सगळं दुर्लक्षित केलं
आयुष्य रंगेबिरंगी गोल चक्र आहे आणि आपण त्यात सगळे रंग क्रमाने जगत असतो!
"आई ग!" ओठातून आलेली कळ थेट काळजातून निघाली होती. त्यादिवशी मी आई होणार होते. आई होण्याच्या शारीरिक वेदना काय असतात हे तेव्हा समजलं. डॉकटरने माझ्या कन्येला पहिल्यांदा हृदयाशी धरायला दिल त्या वेळी तिची नाळ तोडली असली तरी माझ्या काळजाशी ती अतूट जोडली गेली.
मग तू मला भेटायला आलीस ती अजून माया उराशी बाळगून आई ची आजी होऊन. माझ्या बरोबर रात्रभर जागरण करताना तु आमच्या बालपणीचे, तुझ्या बाळंतपणाचे किस्से सांगत होतीस. मला खूप समजून घेत होतीस अगदी फुलासारखे जपत होतीस. तेव्हा मला माझी आई एक आईच्या नजरेतून पाहता आली. ज्या आईने माझ्यासाठी एवढे कष्ट काढले तिला मी वेळ प्रसंगी कशी काय अशी तिरसट उत्तर देते याची माझी मलाच लाज वाटायला लागली. आई, खरच अस वाटत होतं की किती सहन केले आहेस तू. आज तर इतक्या सोइ सुविधा आहेत तुझ्याकाळी असे काही नव्हते . किती कष्ट सोसले आहेस तू.
मूल कसेही वागले तरी आई नाही बदलत. तिला मुलाचे भविष्य सुंदर बनवायचं असत त्यासाठी ती सर्व प्रयत्न करते हे मला तुझ्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणविलेे.
आई ही आई असते जन्मभर. काही अति हुशार मुलांचे म्हणणे असते की हे तर तिचे कर्तव्य होते त्यात काय. त्यात काय आहे हे आई झाल्याशिवाय नाही कळणार(तुझा हा dialogue मी आता वापरायला शिकले आहे😇😜).
मला वाटत मी तुला खूपच गृहीत धरले. आईवर इतकं प्रेम असते की बहुतेक तिच्याशी आपण काही बोलू शकतो आणि मनाचे सगळे ताण विसरून जाऊ शकतो. कारण आई सागर समान आहे जे येते ते सामावून घेते. तिची माया अथांग आहे.
माझ्या आई होण्याच्या प्रवासामध्ये आता तू माझी नव्याने मैत्रीण झाली आहेेस.
मी एवढंच मागते की तुला खूप आरोग्यपूर्ण दीर्घ आयुष्य मिळो आणि आपल्या मैत्री मधील मस्ती अशीच मजेत वाढत राहो.
अजून खूप काही लिहायचं आहे. कितीतरी प्रसंग मला मी आई म्हणून घडताना तुझी आठवण करून देतात तेव्हा मी मनात तुला आदराने नमस्कार करते. काही किस्से तुझे आठवून गालात हसते. पण तूच शिकविले आहेस की पत्र मुद्देसूद असावे उगीच फापट पसारा नसावा ☺. तसही तुला माझ्या मनात काय आहे हे मी न सांगताच कळते आजही ते कळेलच😊.काळजी घे.
तुझी लाडकी,
लेक