पहिला पाउस बरसुन गेला आणि निसर्ग कसा मनापासुन हसला.खरच काय सुन्दर कल्पना आहे ना देवाची 'पाउस'! गुबगुबीत काळया ढगातुन पाण्याचे थेम्ब नाहीत तर जणू जीवन बरसत असत..आपण वयाने कितीही मोठे झालो तरी पाउस सुरु झाला की मन लहान मुलाप्रमाणे खुश होउन जाते.. चिम्ब भिजल्यावर गरम चहा आणि कांदा-भजीचा बेत म्हणजे वाह!
पावसावर तुमच्याशी गप्पा मारताना एक कविता सुचली आहे..कितीही प्रयत्न केले तरी पावसाला शब्दात बांधता येत नाही..त्याचा काही अंश म्हणजे ही कविता..
ढ़ग दाटुन आले नभी ,
थेंबांनी सुर छेडीले,
माती ओली हसली गाली ,
पान पान एकमेका सांगे....
झेलताना गार सरी,
वासरू गोठ्यात लपले,
कुठे रानमाळावरी दूर,
नविन बिज अंकुरले...
अशी सरीवर सर आली,
मनही ओले चिंब झाले,
नदी बनुन धावले कधी,
इंद्रधनूच्या रंगात रंगले....
सरली सर परी,
मृद-गंध रेंगाळतो दारी,
इवल्याश्या डबक्यात,
पहुडे नाव कागदाची...
थेंबांनी सुर छेडीले,
माती ओली हसली गाली ,
पान पान एकमेका सांगे....
झेलताना गार सरी,
वासरू गोठ्यात लपले,
कुठे रानमाळावरी दूर,
नविन बिज अंकुरले...
अशी सरीवर सर आली,
मनही ओले चिंब झाले,
नदी बनुन धावले कधी,
इंद्रधनूच्या रंगात रंगले....
सरली सर परी,
मृद-गंध रेंगाळतो दारी,
इवल्याश्या डबक्यात,
पहुडे नाव कागदाची...