भगवान बुद्धांची सुन्दर मन्दिरं पाहून झाली आणि आता शेवटच मंदिर पहायला जाणार तेवढ्यात दादा समोरून आला आणि हात मिळविण्यासाठी पुढे करत म्हणाला "चला माझा तुमच्या बरोबर प्रवास इथेच संपला,प्रवासासाठी शुभेच्छा" तेव्हा मी हसत हात दिला.पण जसा दादा पुढे निघून गेला तसा मनातील एक कप्पा रिकामा होतोय अस वाटायला लागले.मी दादा मागे त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी धावले ..छानसा गणपती बाप्पा आणि त्याखाली स्वाक्षरी देत अजुन एक ओळ वर लिहिली होती "हसत रहा" .मला लवकर चल अशी हाक एकु येत होती पण अस वाटत होत अरे अजुन तर मला दादाशी खुप गप्पा मारायच्या होत्या, त्याच्या बरोबर दंगा करायचा होता...मी परत धावत गेले आणि वहीतून एक पान फाडले,त्यावर चार ओळी लिहिल्या आणि दादाच्या हातामध्ये देऊन आले.दादा विचारत राहिला अग काय आहे हे? तोपर्यंत मी मंदिरामध्ये निघून गेले होते।
आमची जेव्हा ट्रिप सुरु झाली होती तेव्हा दादा म्हणाला होता" मी सगळ्यान्ना खुप चिडवणार आहे,तुम्हाला राग आला तर मी माफी मागणार नाही कारण मी तुम्हाला माझ्या घरातील एक सदस्य मानतो. मी समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून बोलतो जर समोरच्याने नजर चोरली तर तो त्याचा दोष आहे"
पण दादा दर वेळी तुझ्या नजरेला नजर नाही मिळवता येत.कारण कधी कधी तूझ्यातील सच्च्या-सरळ-अजुनही मातीला रुजून असलेल्या विचारांना एकून आदराने नजर खाली झुकते, तर कधी तूझ्या मिश्किल स्वभावाने हसताना तर कधी भिजलेल्या कड़ा लापविताना पापणी मिटते...
तुला मी जाताना हातामध्ये कागदाचा टुकड़ा दिला आणि त्यावर काही मनातील शब्द लिहिले तेव्हाही मी तुझ्याकड़े न बघताच गेले. तू "हसत रहा" लिहिलेल्या मजकुराचा मला मान ठेवायचा होता.पण कागदा वर लिहिलेल्या ओळी तेवढ्याच प्रसंगाला साजेश्या होत्या॥
तुझं माझं म्हणता म्हणता,
आपलस जग बनत.
अनोळखी नजरेतुनही
आपुलाकिचं नात जुळत
आपलस जग बनत.
अनोळखी नजरेतुनही
आपुलाकिचं नात जुळत
परतीच्या मर्गा वर असताना मी बऱ्याच गोड आठवणी पदरी घेउन चालले होते..येताना जरी एकटी होते तरी जाताना बरीच जीव-भावाची नाती जोडून चालले होते...नितळ मैत्रीने मंतरलेले हे ७ दिवस जणू एक नवे आयुष्य मी इथे जगले.
No comments:
Post a Comment