जसा जसा २१ नवम्बर २०१० हा दिवस जवळ येत होता तस तसा माझ्या मनात नविन उत्साहाचा, कुतुहलतेचा आणि नव्या विचारांचा नुसता गोंधळ चालला होता.बघता बघता तो दिवस उगवला ज्याची मी मागील कित्तेक वर्षे वाट पहात होते......
पहिला विमान प्रवास-विदेश प्रवास-अनेक अनोळखी चेहरे आणि माझ्या मनात उजळणी चालली होती ती घरामधुन निघताना मिळालेल्या अनेक सूचना वजा आदेशांचे!
रात्रों २:१० वाजता निघालेले आमचे विमान पहाटे ६ वाजता Bangkok ला पोहचले.आमच्या my fair lady-Thailand trip मध्ये एकुण १३० जणी होत्या। साधारण ४० जणी एक बस मध्ये अश्या ४ बसेस आयोजित करण्यात आल्या होत्या.
Bangkok वरून Pattaya चा प्रवास गतीने चालू असला तरीही अजुन विमानाच्या खिड़कीमधुन पहिल्यांदाच पाहिलेल्या सुर्योदयाचा सोनेरी प्रकाशाचा कवडसा मनामध्ये डोकावत होता. Pattaya च्या होटलला पोहचे पर्यंत मी माझ्याच विश्वामध्ये गुंग होते. अजुनही आजुबाजुचे चेहरे नवे-कोरे भासतच होते.
संध्याकाळी सगळे लॉबी मध्ये आलो तर एक 'ओळखीचा हसणारा चेहरा' पाहून आम्ही दंग झालो.त्या व्यक्तीचे नाव होते 'आदेश बांदेकर'.आनंदाने मोठा श्वास घेत हे खर आहे, 'आदेश बांदेकर' आपल्याबरोबर संपूर्ण प्रवासात असणार आहेत याची मनाला खात्री पटवुन दिली.त्यानंतर आम्ही पट्टाया मधील ALCAZAR show पाहिला.
जगातील जवळपास सर्व प्रमुख भाषान्मधिल गाण्यांवर अप्रतिम सादर केलेले नृत्य पहाताना त्या रंगीत दुनिए मध्ये आम्ही सगळे हरवून गेलो.जस जसे दिवसातील तास सरत होते तस तसे आम्ही सगळ्या जणी 'मी' च्या जगामधुन 'आम्ही' च्या जगाला सरावत होतो।
Parasailing, sea-walk , banana boat ride आणि अश्या बऱ्याच पाण्यावरील खेळांनंतर मस्त नारळ पाणी प्यायलो आणि भेळ चा आनंद लुटला।
No comments:
Post a Comment