Saturday, January 30, 2010

मुक्काम पोस्ट- 'मन'

ध्येयाचे पंख, निरागस गोड हसु, रुसलेले क्षण , तिला किंवा त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर गुणगुणलेले गाणे , आईचा मायेचा स्पर्श , बाबांनी दिलेली शाब्बासकी ,जीवनाच सार्थक करण्याची जिद्द आणि बरच काही.... मनाच्या गावात किती आणि काय काय जपलेल असत आपण।

कविचे मन शब्दांच्या पलिकडे रमते, लहान मुलांचे स्वप्नांच्या अद्भुद दुनिए मध्ये आणि चंदेरी केसांच्या थकलेल्याआजी आजोबांचे मंदिराच्या पायरीवर. मनाला कसल्या सीमा नाहीत.ते कोठुन सुरु होते आणि कोठे संपते याची व्याख्या नाही.त्याच्या गतीचा ठाव नाही। समोरच्याच्या मनाचा आपण फक्त अंदाज लावु शकतो। मन म्हणजे अशी तिजोरी आहे की ज्याची किल्ली फक्त आपल्याकडेच असते.

आपले 'मी'
पण आणि मन यामध्ये खुप धुसर सीमारेषा आहे.भावनांच्या अलीकडे 'मी' आणि पलिकडे मन. जगासाठी 'मी' आणि जगण्यासाठी 'मन'. कधी कधी आपण ही सीमारेषा विसरून जातो आणि मनालाच सर्वस्व ठरवतो. मनाला जीवनाचा राजा बनवतो आणि त्याच्या पुढे मग आपण सगळी शस्त्रे टाकतो।

ध्येयामागे धावताना मनाची
जिद्द ' प्रयत्न ते परिणाम' या प्रवासाला गती देते.पण जर यात अपयशाचे अड़थळे आले तर हीच गती घातक ठरते. मन निराश होते आणि पर्यायी आपणही.
मनाच्याही पलीकडे खुप शक्ती आपल्यामध्ये आहे. स्वत:ला बदलण्याची,जग सुन्दर बनवण्याची !
जीवनाचा तराजु समाधान आणि साध्य यामध्ये झुलत असतो .त्याचा समतोल रहावा यासाठी मनाच्या शक्तीचा वापर आपण करु शकतो।
संत रचना यांचे आयुष्यावरील प्रवचन असा तुम्हाला एव्हाना वाटत असेलच पण तुम्ही हे करून बघा. रोज फक्त तुमच्यासाठी काही वेळ दया। या दरम्यान अनेक विचार डोळ्यासमोर येउन जातील.तुम्हीच तुमच्या गुणांच
कौतुक कराल आणि झालेल्या चुकांची दुरुस्ती .
जीवनातील
चढ़ उतार निराश नाही करणार आणि नक्कीच एक सकारात्मक बाजु तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनेल.

No comments: