आज कोणीतरी 'तुझे लग्न कसे ठरले?' असा प्रश्न विचारला आणि मी उत्तर देता देता जुन्या आठवणींमध्ये रमून गेले. दिवस किती भराभर धावतात.कधी असे दिवस होते कि मी जेव्हा माझा होणारा नवरा कसा असेल याची स्वप्न पहात होते आणि आज आमच्या लग्नाला बघता बघता 6 महिने पूर्ण पण झाले.
लाग्नाआधीचे दिवस म्हणजे स्वप्नांची दुनिया असते। ती इतकी मोहक असते कि आपण जसा विचार करू तसेच जग आपल्याभोवती फिरेल असे नेहमी वाटत राहते।mobile- हिंदी गाणी जवळ वाटायला लागतात, घरी greeting कार्ड आणि फुलांचे येणे जाणे सुरु होते.कधी बोलताना विचार केलाही नसेल पण आता भावनांना व्यक्त करताना शब्दांमध्ये बांधणे अवघड होऊन जाते। मस्त फिल्मी वाटते पण तरीही आपले खास नाते सगळ्यांपेक्षा वेगळे आहे असेही मनाने ठरवून टाकलेले असते ।आपण कोणासाठीतरी खास आहोत या विचारानेच मन भारावून जाते। कदाचित सगळ्यांबरोबर काहीसे असेच होते......
लग्नाच्या 6 महिन्यान नंतर लिहिलेला हा blog काही अनुभवांनी सम्पूर्ण नसेलही..पण कदाचित लग्नाचे असेच असते।.वेगळे वेगळे म्हंटले तरी तुमचे माझे same असते :)

प्रेमासाठी जगताना जगण्याची
परिभाषा बदलून जाते,
नव्याने आपल्याला नकळत,
आपली ओळख होते..
आपलेसे भेटते कोणीतरी जेव्हा
नियमांचे गणित चुकते,
नियमांचे गणित चुकते,
अवघडही होऊन जाते सोप्पे
विचारांची दिशा बदलते..
कवी कल्पनांचे विश्व सारे,
हळू-हळू आपलेसे होऊन जाते,
चांदण्या-दवबिंदू-रंग फुलांचे,
अजूनच मोहक रूप घेते...
किती सांगावे किती बोलावे,
भान अनेकदा हरपून जाते,
प्रेमात पडल्यावर कळते,
जीवन किती सुंदर असते.
जस-जशी लग्नाची तारीख जवळ येते तशी मनाला नव्या नात्यांची ओढ लागते. इतके दिवस पाहिलेल्या स्वप्नांना साकारताना काही वेगळेच सुख मिळते. लग्नाची धावपळ संपते आणि आई-बाबांना निरोप देताना मन गोंधळून जाते.सगळे आपल्याला आधीपासून माहित असते पण तरीही काही प्रश्नांची उगीच मनात लुडबुड सुरु होते। काही दिवसांनी मनाची गाडी रुळावर येते।लग्नाआधीच्या जादूमयी दुनियेमध्ये आता कुकरची शिट्टी वाजते, सामानाची यादी असते,पाहुण्यांची ये-जा असते. जादूमयी दुनियेतील राजकुमारी आता कोणाची सून असते, कोणाची वहिनी असते. लग्नाआधी ताई म्हणून हाक मारणारी चिमुकली मंडळी आता काकू म्हणून हाक मारतात. घरी पोळीचे नकाशे बाबा वाह! म्हणत खात असतात पण तोच भूगोल लग्नानंतर गोल करावाच लागतो। लग्नाची हीच मजा आहे. आपण असेही वागू शकतो याचे मलाच कधी कधी आश्चर्य वाटते।
लग्नाआधी मनाला जाणणारा मित्र आणि लग्नानंतर मनापासून प्रेम करणारा जीवन-सहप्रवासी म्हणून हातात हात घेणार्या नवर्याशी मैत्री अजून धृढ होते .नवरा-बायको मधील भांडणांची मजा काही औरच असते :).
सुख कशाला म्हणायचे आणि समाधानाची वाख्या आपल्याच हातामध्ये असते हे लग्नानंतर अनुभवातून कळते। लग्नाआधीचे आणि नंतरचे प्रेम तेच असते पण एकमेकांना जाणून घेताना ते अजून परीक्व होत जाते.
मंगल समयी सनई चौघडे,
सौभाग्याचे क्षण घेऊन आले
अक्षदांच्या कणा-कणातुन,
शुभ आशीर्वाद लाभले
पदरात लपवून माहेरचा ओलावा,
नव्या दिशांकडे चालली पाऊले
ओलांडले माप उंबरठ्यावरील,
नवीन नात्यांशी नाते जुळले
नवीन जगात हरवल्यावर,
संस्कारांची गुरुकिल्ली कामी येते,
' प्रेमाने जग जिंकता येते ',
आईची शिकवण अनुभवातून पटते..
संसाराची न वाख्या असते,
कदाचित शब्दांच्या पलीकडे काही असते,
तुझे माझे म्हणता म्हणता,
आपलेसे जग होऊन जाते..
लग्नाच्या 6 महिन्यान नंतर लिहिलेला हा blog काही अनुभवांनी सम्पूर्ण नसेलही..पण कदाचित लग्नाचे असेच असते।.वेगळे वेगळे म्हंटले तरी तुमचे माझे same असते :)
1 comment:
Mastach...
Post a Comment